Droupadi Murmu  Team Lokshahi
वेब स्टोरीज

Droupadi Murmu : महामहीमचे नाव पुती होते, वर्गशिक्षिकेने बदलून द्रौपदी केले, वाचा तो किस्सा

भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी आज (सोमवारी, ता. २५) राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यावेळी नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली.

Published by : Team Lokshahi
Droupadi Murmu

भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित समारंभात देशाचे १५ वे राष्ट्रपती म्हणून मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Droupadi Murmu

शपथ ग्रहण समारंभानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भाषण झाले. त्या म्हणाल्या, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे ही तिची वैयक्तिक उपलब्धी नसून भारतातील प्रत्येक गरिबांसाठी मोठी संधी आहे.

Droupadi Murmu

भारतातील गरीब लोक स्वप्न पाहू शकतात आणि ते पूर्ण देखील करू शकतात, हे आता सिद्ध झाले आहे. ज्यावेळी आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत अशा निर्णायक काळात मला देशाने राष्ट्रपती म्हणून निवडले आहे.

Droupadi Murmu

आजपासून काही दिवसांनी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. हा देखील योगायोग आहे की, जेव्हा देश स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष साजरे करत होता, तेव्हापासूनच माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी त्यांना ही नवी जबाबदारी मिळाली आहे.

Droupadi Murmu

मी स्वतंत्र भारतात जन्मलेला देशाचा पहिली राष्ट्रपती आहे. आमच्या स्वातंत्र्य सेनानींनी जी स्पप्न पाहिली ती 75 व्या वर्षात पुर्ण करण्यासाठी वेगाने प्रयत्न करावे लागणार आहे.

Droupadi Murmu

भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदीचे नाव तिच्या शाळेतील एका शिक्षिकेने 'महाभारत' या महाकाव्यातील पात्रावरून ठेवले होते. काही वेळापूर्वी एका ओडिया व्हिडिओ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मुर्मूने सांगितले होते की तिचे नाव "पुती" होते, जे शाळेतील एका शिक्षकाने बदलून द्रौपदी केले होते.मुर्मूने यांनी सांगितले की, “द्रौपदी माझे खरे नाव नव्हते. माझे नाव दुसर्‍या जिल्ह्यातील एका शिक्षकीने दिले होते, ती शिक्षिकाा माझ्या मूळ मयूरभंज जिल्ह्यातील नव्हती.

Droupadi Murmu

मुर्मूने यांनी सांगितले की, “द्रौपदी माझे खरे नाव नव्हते. माझे नाव दुसर्‍या जिल्ह्यातील एका शिक्षकीने दिले होते, ती शिक्षिकाा माझ्या मूळ मयूरभंज जिल्ह्यातील नव्हती.

Droupadi Murmu

मुर्मू यांचे लग्नापुर्वीचे आडनाव टुडू होते. विवाहानंतर नाव बदलून मुर्मू झाले. त्यांचे लग्न बँकेत अधिकारी असलेले श्यामचरण मुर्मू यांच्यांशी झाले होते.

Droupadi Murmu

अनेक वर्ष राजकारणात राहूनही द्रौपदी मुर्मू यांनी जमिनीशी नाते कधी तुटले नाही. त्यांची संपत्ती १० लाख रुपये असून त्यांच्या नावावर एकही गाडी नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा