माणूस धर्माकरिता नाही तर, धर्म हा माणसाकरिता आहे.
कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो, तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो.
शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.