Hardik Akshaya Engaged Team Lokshahi
वेब स्टोरीज

Hardik Akshaya Engaged : राणा दा आणि पाठक बाईचं पार पडला साखरपुडा

अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्याविषयी सुरु होत होत्या चर्चा

Published by : shamal ghanekar

मनोरंजन विश्ववातील एक आनंदाची बातमी समोर येत आहे. झी वाहिनीवर 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणा दा म्हणजे हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेले राणा दा आणि पाठक बाई हे त्यांच्या अभिनयाने चर्चेत असायचे. अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्याविषयी चर्चा सुरु होत होत्या.

Hardik Akshaya Engaged

या दोघांबद्दल होणाऱ्या चर्चेला आता पुर्णविराम दिला असून या दोघांनी त्याच्या सोशल मिडियावर आकाउंटवरून त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

तुझ्या जीव रंगला मालिकेच्या माध्यमातून हार्दिक आणि अक्षयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेतील त्यांची नावे ही सुंदर आणि अजून या नावांची चर्चा अजून होत आहे. राणा दा आणि पाठक बाई... अशी ही त्यांची नावे होती.

Hardik Akshaya Engaged

हे दोघेही सोशल मिडियावर (Social Media) संक्रिय असतात. तसेच त्यांनी त्याच्या सोशल मिडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

Hardik Akshaya Engaged

या फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळतोय. फोटोंमधील (Photo) दोघांची केमेस्ट्रीही चाहत्यांना खूप आवडत आहे.

Hardik Akshaya Engaged

यावेळी दोघेही खूप खुश दिसत आहेत. या दोघांनी खऱ्या आयुष्यात एकमेकांना जोडीदार म्हणून स्विकारले आहे.

सध्या अक्षया आणि हार्दिकचे साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होत असून फोटोंवर आणि व्हिडीओंवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today :सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश