Earth Hour 
International

Earth Hour 2022: आज रात्री ‘अर्थ अवर’मध्ये सहभागी व्हा! विद्युत दिवे बंद करून केला जाणार साजरा

Published by : Vikrant Shinde

आज रात्री जगभरातील लोक अर्थ अवर (Earth Hour) साजरा करणार आहेत. पृथ्वीच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरण (Environment) सुधारणेसाठी मार्चचा शेवटचा शनिवार दरवर्षी अर्थ अवर म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात. पृथ्वीवरील पर्यावरण अधिक चांगले करण्यासाठी आपला एकतेचा संदेश या माध्यमातून दिला जातो.

पर्यावरण संबधीत समस्यांविषयी लोकांना जागरूक करणे आणि त्याच्या सुरक्षिततेत हातभार लावण्यासाठी त्यांना पुढे आणणे हे यामागचं उद्दीष्ट आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे महत्त्व कोरोना साथीच्या निमित्ताने आणखी वाढले आहे. 31 मार्च 2007 रोजी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनी शहरात प्रथमच अर्थ अवरचं आयोजन करण्यात आलं होतं. हळूहळू हा दिवस जगभर साजरा होऊ लागला आहे. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) ने 2007 मध्ये अर्थ अवर डे सुरू केला. अर्थ अवर फाउंडेशनचे सह-संस्थापक अँडी रिडले यांनी WWF च्या सहकार्याने ही मोहीम सुरू केली.

भारत 2009 मध्ये या मोहिमेचा भाग बनला होता. यात 58 शहरांमधील 50 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. यानंतर ही संख्या वाढतच आहे.

अर्थ अवर डे दरम्यान जगभरातील अनेक ऐतिहासिक इमारतींची (Historical buildings) लाईट बंद केली जाते. यामध्ये न्यूयॉर्कमधील एम्पायर वर्ल्ड बिल्डिंग, दुबईतील बुर्ज खलिफा, पॅरिसमधील आयफेल टॉवर आणि अथेन्समधील अ‍ॅक्रोपोलिस अशा 24 जगप्रसिद्ध वास्तूंचा समावेश आहे. भारतातील अर्थ अवर दरम्यान राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक वास्तूंची लाईट बंद केली जाते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप