पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला होईल. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती.
पण या निवडणुकीत कोणालाही विजय मिळाला आणि पराभव सहन करावा लागला तरी काही महत्त्वाचं नाही. आज लोकांचे प्राण वाचवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी दिली आहे.