Pashchim Maharashtra

करुणा शर्मा यांचा नवा गौप्यस्फोट; राज्यातील दोन मंत्र्यांच्या बायका शिवशक्ती पक्षात प्रवेश करणार

Published by : Lokshahi News

संतोष आवारे, अहमदनगर | करुणा शर्मा यांनी नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर आज नगरमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार असल्याचे सांगत, त्या मंत्र्यांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, त्यातील एक राष्ट्रवादीचा तर दुसरा शिवसेनेचा मंत्री असल्याचे करुणा शर्मा म्हणाल्यात.

करुणा शर्मा आज नगरला आल्या होत्या. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि राज्यसरकारवर अनेक आरोप करत पुन्हा टीकेची झोड उडवली.दोन मंत्र्याच्या पत्नी माझ्या शिवशक्ती पक्षात येणार असून लवकरच याबाबतचा खुलासा अहमदनगर मध्ये आपण करणार आहोत असा गौप्यस्फोट केला. माझ्यावर जी परिस्थिती आली ती अनेक मंत्र्यांच्या घरांच्या बाबतीमध्ये सुद्धा आलेली आहे ही वस्तुस्थिती आहे. आमच्या पक्षांमध्ये सध्या विद्यमान मंत्र्यांच्या दोन बायका या माझ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये एक राष्ट्रवादी व एक शिवसेनेच्या मंत्र्यांची पत्नी असल्याचेही करुणा शर्मा मुंडे यांनी सांगून त्यांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.

पुढे करुणा शर्मा म्हणाल्या, राज्यात अनेक प्रश्न असून याबाबत आपण लवकरच राज्यपालांना भेटून गार्हाणे मांडणार आहोत असे सांगितले. तसेच औरंगाबाद येथील सभेत मला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवणूक केली आणि यामागे अर्थातच धनंजय मुंडे असल्याचे सांगत आपणाला राजकारण सोडून घरी बसण्यास सांगितले जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा