India

“AMCA” येताच भारत बनेल दुसरा शक्तीशाली देश? “AMCA” म्हणजे काय?

Published by : Lokshahi News

भारत सरकारने 'मेक इन इंडिया'चा नारा दिल्या नंतर भारत अनेक वस्तू विदेशात विकत घेण्यापेक्षा स्वबळावर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. विदेशातील इतर देशांनवर आवलंबून न राहण्याचे 'मेक इन इंडिया' उद्धीष्टे आहेत. भारत स्वातंत्र्यापासून संरक्षण क्षेत्रात रशिया आणि अमेरिका सारख्या देशावर आवलंबून आहे त्यामुळे भारताला अशा बलाढ्य देशांच्या पुढे झुकावे लागते.

भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याकरीता व भारतीय वायूसेनेला अधिक बलाढ्य बनवण्याकरिता "AMCA" म्हणजे अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टची निर्मिती एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए),संरक्षण संशोधन आणि विकास संघटना,डीआरडीओ, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनमार्फत हे लढाऊ विमान बनवले जाणार आहे."AMCA" एकल-सीट, दुहेरी इंजिन, स्टील्थ ऑल-वेदर स्विंग-रोल लढाऊ विमान असेल, ज्यात "सहाव्या पिढीची वैशिष्ट्ये" असण्याची अपेक्षा आहे.

"AMCA" ज्यामध्ये हवेतुन हवेत किंवा जमिनीवर मारक करण्याची क्षमता आहे. एअर डिफेन्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेस मिशन यासारख्या अनेक मोहिमा पार पाडण्याचा हेतू आहे, एएमसीए डिझाइन लो रडार क्रॉस सेक्शन आणि सुपरक्रूझ क्षमतासाठी अनुकूलित आहे.
"AMCA"चा प्राथमिक डिझाइनच्या टप्प्यावरील अभ्यास पूर्ण झाला आहे आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रकल्पाने तपशीलवार डिझाइन टप्प्यात प्रवेश केला. "AMCA"प्रथम उड्डाण २०२५ पर्यंत होईल आणि २०३० पर्यंत उत्पादन सुरू होईल.

"AMCA" सध्या भारतातील विकासातील एकमेव पाचव्या पिढीचे विमान आहे, त्याला संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळणे अपेक्षित आहे.
हे लढाऊ विमान स्टेल्थ असल्याने हे विमान शत्रुच्या रडारावर दिसणार नाही. याप्रतिचे विमान अमेरिका या एकमेव देशाकडे आहे तेथे एफ२२ रॅपटर या नावाने ओळखले जाते.हे विमान अधिक घातक असल्याने अमेरिकेने हे विमान इतर देशांना विकण्यास मनाई केली आहे.चिन,रशिया,फ्रान्स सारख्या देशांनी सुद्धा अशा प्रतिचे विमान बनवण्याचा विडा उचलला आहे.यावरुनच भारतात तयार होणारे "AMCA" किती घातक असेल याचा अंदाज लावता येतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली