Admin
Vidhansabha Election

आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पहाल तर याद राखा, यशोमती ठाकूर यांचा इशारा

बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पहाल तर याद राखा असा इशारा यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

सुजय विखे यांच्यासमोर भाजपच्या स्टेजवर भाजपच्या एका व्यक्तीने बाळासाहेब थोरात यांच्या कन्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले हे विखे आणि फडणवीस यांना पटत आहे का ज्यांनी महिलांना प्रोटेक्शन करून आमदारकी घेतली आहे ते आता झोपले आहेत का यामधून महिलांप्रती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची काय मानसिकता आहे हे दिसून येत आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असेही यशोमती ठाकूर म्हणाला आहे. असे वक्तव्य जर भाजपच्या नेत्यांना आवडत असेल तर त्यांचा निषेध आहे. देवेंद्रजी तुमच्या राज्यात काय चालले आहे याला आपण रामराज्य म्हणायचं का? तुमचे असली रंग समोर येत असून आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहिले तर खबरदार याद राखा असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटीलांची ठाम भूमिका; भारत-पाकिस्तान क्रिकेटवर आक्षेप

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात; भारत-पाक सामना प्रकरणावरून चांगलीच जुंपली

UBT Protest : छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरु; भारत-पाक सामना प्रकरणी संताप