Vidhansabha Election

Yashomati Thakur's counter attack to Navneet Rana: यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणांवर पलटवार

नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार नवनीत राणा बोलत होत्या. यावेळी त्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"देवासमोर मांडलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईनी केलं. दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचं काम माझ्या नणंद बाईने केलेलं आहे. माझी नणंद बाई 3 टर्मपासून प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात." असं राणा म्हणाल्या होत्या.

यावर प्रत्युत्तर देत, "राणा नैराश्यात गेल्याने त्यांची बोलण्याची पातळी घसरली आहे. त्यांच्या बेताल वक्तव्यामुळेच त्यांचा पराभव होणार आहे." असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा