Mumbai

यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिले ५० लाखांचे घड्याळ? गुप्त डायरीतील माहिती!

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav ) यांनी कोट्यवधींची उलाढाल केली असल्याचे आयकर विभागाच्या (income tax department) अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचदरम्यान अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक डायरी प्राप्त झाली असून, यामध्ये अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.

यशवंत जाधव, चे निकटवर्तीय आणि कंत्राटदारांच्या संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी केलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. यातच, जाधव व त्यांच्या निकटवर्तीयांनी गेल्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून, यामध्ये एक डायरी मिळाली आहे. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ दिले असून, गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याची नोंद आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे.

यशवंत जाधव यांनी दावे फेटाळले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री (matoshree) आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सदर दावे फेटाळले असून, आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे म्हटले आहे. आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. या संशयास्पद नोंदींशिवाय, न्यूजहॉक मल्टिमिडिया कंपनीशी अनेकविध प्रकारचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे. या कंपनीच्या मालकाचे नाव विमल अग्रवाल आहे. याचाही तपास केला जात आहे.

कसा झाला घोटाळा? 

शेल कंपनींच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल करत कॅश पैसा या कंपनींना देण्यात आले आणि या कंपनीच्या माध्यमातून लिगल एन्ट्री स्वःताच्या आणि आपल्या निकटवर्तीयांच्या नावावर घेण्यात आल्या, लोनच्या स्वरुपात परिवारातील इतर सदस्यांना पैसे या शेल कंपनीकडून देण्यात आले. एकूण 15 कोटी रुपये यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यांमधून कर्ज म्हणून घेतले. आयकर विभागाच्या अहवालानुसार, उदय शंकर महावर या व्यक्तीकडून 2019-20 मध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि इतर सदस्यांना 15 कोटी दिले गेले. ही 15 कोटींची रोख रक्कम यशवंत जाधव यांनी उदय शंकर महावर यांना दिले आणि नंतर उदय शंकर यांच्या कंपनीकडून आपल्या खात्यांमध्ये लीगल एंट्री करुन घेतले. यातील 15 कोटी पैकी 1 कोटी यामिनी जाधव यांनी कर्ज घेतलं आणि ते निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा