Bye Bye 2024

Year Ender 2024: यंदाच्या वर्षात 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नबंधनात!

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. वर्ष सरताना अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यंदाच्या वर्षात कलाकारांनी जोडीदाराबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात केली.

Published by : shweta walge
2024 bollywood wedding

2024 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. या वर्षी अनेक बॉलीवूड स्टार्स लग्नबंधनात अडकले आहेत.

वर्षाची सुरुवात आमिर खानची मुलगी आयरा खानने 3 जानेवारी 2024 रोजी फिटनेस कोच नुपूर शिखरेशी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. यानंतर, 10 जानेवारी 2024 रोजी उदयपूरमध्ये या जोडप्याने डेस्टिनेशन वेडिंग केले.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी या वर्षी 21 फेब्रुवारी 2024 रोजी विवाह सोहळा पार पडला. दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते. त्यांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रांशिवाय अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा मार्चमध्ये विवाहबद्ध झाले. दोघांचे लग्न दिल्लीत पार पडले. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांता जून महिन्यात विवाह पार पडला. या जोडप्याने 23 जून रोजी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्न केले.

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनीही यंदा लग्न केले. सप्टेंबरमध्ये पारंपारिक पद्धतीने दोघांनी लग्न केले.

डिसेंबर महिन्यात नागा चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये दोघांचा लग्नसोहळा पार पडला.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री किर्ती सुरेशने बॉयफ्रेंड अँटनी थैटिलसोबत लग्न करून संसार थाटला आहे. किर्ती आणि अँटनी यांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."