Bye Bye 2024

Year Ender 2024: 2024 या वर्षात कोणते व्हिडीओ सर्वात जास्त सर्च केले गेले?

2024 या वर्षात सर्वाधिक सर्च केले गेलेले व्हिडीओ कोणते होते? जाणून घ्या या वर्षातील लोकप्रिय व्हिडीओंची यादी आणि त्यांची वैशिष्ट्ये.

Published by : Team Lokshahi

यंदाचे 2024चे वर्ष वेगवेगळ्या ट्रेंडने पुरुन उरला. यंदाचा Annual Search Report गुगलने जाहीर केला आहे. या रिपोर्टमुळे आपल्या भारतीयांनी या वर्षामध्ये सर्वात जास्त गुगलवर तसेच युट्यूबवर काय सर्च केलं त्याची माहिती आपल्याला कळते. या वर्षी देशात अनेक मोठ्या घटना घडल्या ज्यांची खूप चर्चा झाली.

ज्यांची माहिती सविस्तर मिळवण्यासाठी त्या युट्यूबवर सर्च केल्या गेल्या. सध्या ट्रेडिंग काय आहे किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ, एखाद्या सेलिब्रिटीविषयी माहिती असं बरंच काही आपण गुगल किंवा युट्यूबवर सर्च करत असतो. जाणून घेऊ यावर्षी अशा कोणत्या व्हिडीओ सर्वात जास्त सर्च केले गेल्या.

ट्रेंडींगला असणारे विषय

2024 ची लोकसभा निवडणूक, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, राधिका-अनंत अंबानी यांचे ग्रँड वेडिंग, आयपीएल, यांना 2024 मध्ये व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबवर सर्वाधिक ट्रेंडिंग टॉपिक्समध्ये स्थान मिळाले आहे. 'कल्की 2898' या चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. टोटल गेमिंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या अज्जू भाईनेही या यादीत स्थान मिळवले आहे. लोकप्रिय झालेल्या 'मोये मोये' या गाण्याला अनेक लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

'मोये मोये' हा ट्रेंड इतर कंन्टेटमध्ये देखील मर्ज करून त्याची व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्यात आली होती. गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याचे मुंबईत आणि इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेले कॉन्सर्ट हे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात सर्च केले गेले आहेत. त्याचसोबत यामध्ये हिंदी तसेच मराठी गाण्यांचा देखील समावेश आहे ज्यामध्ये 'गुलाबी साडी', तेरी बातों में ऐसा उलझा जिया', 'आज की रात', 'तौबा तौबा' तसेच काळी बिंदी, 'हीर आसमानी', 'सजनी रे', ही गाणी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घालत होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा