Vidhansabha Election

Election Voter ID: मतदानासाठी 12 ओळखपत्रांचे पर्याय; मतदानकार्डाची गरज नाही

निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारं ओळखपत्र तुमच्याकडे नसेल किंवा गहाळ झालं असेल, तर अशावेळी काय करावं असा प्रश्न काही मतदारांना पडतो.

Published by : Team Lokshahi

20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. अशात जर निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारं ओळखपत्र तुमच्याकडे नसेल किंवा गहाळ झालं असेल, तर अशावेळी काय करावं असा प्रश्न काही मतदारांना पडतो. याबाबत निवडणूक आयोगाने आणि राज्याच्या माहिती संचलनालयाने माहिती दिली आहे.

महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क संचलनालयाने सांगितलं आहे की, "मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या छायाचित्र ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे."

'हे' आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे :-

1. आधार कार्ड

2. पॅनकार्ड

3. पारपत्र (पासपोर्ट)

4. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबूक

5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

6. मनरेगा रोजगार ओळखपत्र

7. भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड

8. केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज

9. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

10. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र

11. संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र

12. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र

(अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक)

या 12 ओळखपत्रांपैकी कोणत्याही ओळखपत्राच्या आधारे तुम्ही आता तुम्ही मतदान करु शकणार आहात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष