Mumbai

खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू

Published by : Team Lokshahi

मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनच्या (local train) गर्दीने आणखी एकाचा बळी गेला. अंधेरी (Andheri) ते नालासोपारा (Nalasopara) जाणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. कामावरून घरी परतणाऱ्या रतन विश्वकर्मा (Ratan Vishwakarma) ट्रेनच्या दारात उभ्या असलेल एक प्रवासी खांबाला धडकून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

हा अपघात गोरेगाव (Goregaon) आणि मालाड (Malad) स्थानकादरम्यान घडला, घटनेनंतर तरुणाला गंभीर जखमी अवस्थेत कांदिवलीच्या सताब्दी रुग्णालयात (Satabdi Hospital) आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले, मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात (Bhagwati Hospital) पाठवण्यात आला. लोकल गाड्यांमध्ये जास्त गर्दी झाल्याने हा अपघात झाला. बोरिवली जीआरपीने GRP गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा