थोडक्यात
युगेंद्र पवार यांनी मतमोजणी पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुकीसारखं वातावरण असताना विधानसभेच्या निवडणुकीत मोठं बदल कसा घडला, यासाठी अर्ज दाखल केला.
काही गावांमध्ये जास्त मतं मिळतील अशी खात्री असताना, तिथे देखील कमी मतं पडल्याचं युगेंद्र पवार यांनी सांगितलं.
युगेंद्र पवार यांनी मतमोजणी पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीसारखं वातावरण असताना विधानसभेच्या निवडणुकीत एवढं मोठं बदल कसं घडले, यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. काही गावांमध्ये जास्त मतं मिळतील अशी खात्री असताना, तिथे देखील कमी मतं पडल्याचं युगेंद्र पवार यांनी सांगितलं आहे.
बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे, "सर्व प्रक्रियेत पारदर्शकता न राहिल्यामुळे मतमोजणी संशयास्पद ठरली आहे. माझ्यासह अनेक उमेदवारांच्या मते पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे," असे युगेंद्र पवार म्हणाले. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघात पवार विरूध्द पवार लढतीत अजित पवारांचा विक्रमी मतांनी विजय झाला तर युगेंद्र पवारांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर राज्यात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVM) वर शंका उपस्थित केली जात आहे. युगेंद्र पवारांसह पुण्यातील अकरा उमेदवारांनी मत पडताळसाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामध्ये शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप व भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला आहे.