Vidhansabha Election

Yugendra Pawar : अर्ज भरण्याआधी युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

युगेंद्र पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

युगेंद्र पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बारामती मतदारसंघासाठी ते अर्ज दाखल करणार असून शरद पवार यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार म्हणाले की, आज आपण फॉर्म भरायला जाणार आहे. खूप आनंद वाटत आहे.

चांगल्या दिवशी आपण फॉर्म भरायला जात आहे. कुठल्याही आईला वाटते त्यांच्या मुलांनी, मुलींनी पुढे गेलं पाहिजे त्यांनी त्या पद्धतीने आशीर्वाद दिले. पहिलीच निवडणूक जरी असली तरी समाजकारणात आता बऱ्याचवर्षापासून आम्ही काम करत आलो आहे. माझी पहिली निवडणूक जरी असली तरी पवार साहेब माझ्या पाठिशी आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आपण यशस्वी होऊ.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, बारामतीकरांनी पवार साहेबांना 27व्या वर्षी निवडून दिलं. त्यांना आशीर्वाद दिला. तशीच मी आज इच्छा व्यक्त करतो की मला ही पहिल्यांदा त्यांनी सर्वांनी निवडून द्यावं. साहेबांनी जसं चांगलं काम त्यांच्यासाठी केलं त्यापद्धतीने मी नक्कीच करेन. असे युगेंद्र पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....

Maharashtra Top In Digital Payment : UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्र अव्वल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Gatari 2025 Special Non- veg Recipe: गटारीला घरच्या घरी बनवा 'हे' हॉटेल स्टाईल मासांहार

Akkalkot : छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं कार्यकर्ते आक्रमक; अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं