Government Jobs India
Government Jobs India

Job Alert: बँकिंग आणि रेल्वे क्षेत्रात तुफान संधी उपलब्ध; हजारो पदे रिक्त, आताच अर्ज करा

Government Jobs India: एसबीआय, रेल्वे आणि राजस्थान शिक्षण मंडळाकडून नवीन भरती व प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

देशभरातील तरुणांसाठी रोजगार व शिक्षण क्षेत्रातून महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी ठरले असले तरी, एसबीआयतील विशेषज्ञ अधिकारी भरती, रेल्वे NTPC अर्जाची वाढवलेली अंतिम तारीख, राजस्थान BSTC नोंदणीची सुरुवात आणि ग्रेड-४ उत्तर कीवरील आक्षेप प्रक्रिया ही तरुणांसाठी मोठी संधी ठरत आहे.

PM internship Scheme

पीएम इंटर्नशिप योजनेला वर्ष पूर्ण झाले असूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. मोठ्या कंपन्यांत इंटर्नशिप देऊन युवांना कौशल्यवृद्धी करणे हे उद्दिष्ट असले तरी, नोंदणीकृत तरुणांपैकी अत्यल्पांनीच प्रशिक्षण पूर्ण केले. मोठा निधी खर्चूनही योजनेची गती कमी असल्याचे चित्र समोर येत आहे.

Government Jobs India
Safest Banks: तुमचे पैसे कुठे सुरक्षित? RBIने सांगितली देशातील सर्वात सुरक्षित 3 बँकांची नावे

SBI SO Recruitment 2025

पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एसबीआयने एकूण ९९६ स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू झाली असून उमेदवारांना २३ डिसेंबरपर्यंत अधिकृत sbi.bank.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.

Government Jobs India
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिलासा! नोव्हेंबरचे ₹1500 कधी मिळणार? तारीख जाहीर

RRB NTPC 2025

रेल्वे नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. आरआरबीने NTPC पदवीधर भरती 2025 साठी अर्जाची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक उमेदवारांना आता 4 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे, तर अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 6 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

Rajasthan BSTC Pre DElEd 2026 Registration

राजस्थानातील बीएसटीसी प्री डी.एल.एड 2026 प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 2026-27 शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठाने ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुकांनी predeledraj2026.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.

Government Jobs India
Aadhaar Update: आधार अपडेट प्रक्रियेत मोठा बदल, आता केंद्रात न जाता घरी बसून पत्ता बदलणे होणार अधिक सोपे
Summary
  • पीएम इंटर्नशिप योजनेचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी.

  • एसबीआय SO भरतीसाठी ९९६ पदांवर अर्ज सुरू.

  • आरआरबी NTPC अर्जाची अंतिम तारीख वाढवली.

  • राजस्थान BSTC प्री डीएलएड 2026 नोंदणी सुरू.

  • ग्रेड-4 उत्तर की आक्षेप प्रक्रिया 6–8 डिसेंबरदरम्यान.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com