Gas Cylinder ₹300
Gas Cylinder ₹300

LPG Gas Cylinder: महागाईला मोठा दिलासा! गॅस सिलिंडर आता फक्त 300 रुपयांत, राज्य सरकारची मोठी घोषणा

Gas Cylinder ₹300: आसाम सरकारने महागाईत दिलासा देत एलपीजी सिलिंडर फक्त ३०० रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे ज्यामध्ये विशेषतः महिलांना गॅस सिलिंडरसाठी सब्सिडी देण्यात येते. आता आसाम सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आसाममध्ये एलपीजी सिलिंडर केवळ ३०० रुपयांत मिळणार आहे.

Gas Cylinder ₹300
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिलासा! नोव्हेंबरचे ₹1500 कधी मिळणार? तारीख जाहीर

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, महागाईमुळे गरीब कुटुंबीयांच्या घरखर्चावर परिणाम होत असल्यामुळे या निर्णयातून त्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळेल. त्यांनी उल्लेख केला की लवकरच ३०० रुपयांत एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला जाईल.

Gas Cylinder ₹300
CM Devendra Fadnavis: 'EVM सुरक्षोसाठी 24 तास 2 प्रतिनीधी ठेवा'; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना

सरकारने दिलेली माहिती अशी की, ओरुनोदोई स्कीम आणि पीएम उज्जवला योजना अंतर्गत २५० रुपयांची सब्सिडी दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी गेल्या तुलनेत सिलिंडर अधिक स्वस्तात मिळेल, फक्त ३०० रुपयांची किंमत भरावी लागेल. सब्सिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्यामुळे लोकांना गॅस बुक करताना आर्थिक सोय होईल.

आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील महिलांना या निर्णयामुळे मोठा फायदा होईल, कारण त्यांना दर महिन्याला आर्थिक मदत देखील दिली जाते. एलपीजीची किंमत अनेक दिवसांपासून वाढत असल्याने सामान्य लोकांच्या घरखर्चावर ताण वाढला होता. आता या सब्सिडीमुळे घरगुती खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे, आणि विशेषतः मध्यमवर्गीय लोकांना मोठा राहात राहील.

Gas Cylinder ₹300
US News: कॅलिफोर्नियामध्ये F-16 लढाऊ विमान कोसळले! पायलटने शेवटच्या क्षणी उडी मारून वाचवले प्राण, VIDEO VIRAL

आसाम सरकार लवकरच संबंधित विभागांना आणि गॅस डिस्ट्रीब्युटर्सना या नवीन नियमांचे पालन करण्यासाठी निर्देश जारी करणार आहे. यामुळे गरजूंना एलपीजी गॅस अधिक खरेदी सुलभ होईल तसेच महागाईतील ताण कमी करण्यास मदत होईल.

Summary
  • आसाम सरकारकडून एलपीजी सिलिंडर फक्त ३०० रुपयांत उपलब्ध होणार.

  • ओरुनोदोई आणि उज्ज्वला योजनांतर्गत २५० रुपयांची थेट सब्सिडी खात्यात जमा.

  • गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना महागाईत मोठा दिलासा.

  • सरकार लवकरच नवीन नियमांसाठी गॅस वितरकांना निर्देश जारी करणार.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com