Doland Trump Company
Doland Trump Company

Doland Trump Company: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा धमाका! भारतात तब्बल 1 लाख कोटींची गुंतवणूक, कोणत्या प्रकल्पात होणार वापर?

Trump India Investment: डोनाल्ड ट्रम्पच्या कंपनीने भारतात ₹1 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांनी जागतिक स्तरावर अनेक वाद निर्माण झाले आहेत. एका बाजूला ते भारतावर लगातार टॅरिफ लादण्याच्या निर्णयांमुळे देशातील आर्थिक संबंध तणावात आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या कंपनीने भारतात प्रचंड मोठ्या गुंतवणुकीसाठी तयारी दर्शविली आहे. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लादला आहे आणि आता भारताच्या तांदळावरही अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा विचार करत आहे, ज्याचा परिणाम खाद्यपदार्थांसह अनेक वस्तूंच्या किंमतींवर होणार आहे.

या टॅरिफमुळे भारतालाही मोठा आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे, पण त्याचवेळी भारताने पर्यायी उपाय शोधून मोठा तोटा टाळण्याचा प्रयत्न केला आहे. डोनाल्ड ट्रम्प अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपले मित्रत्व जाहीर करतात, तरीही भारतावर आर्थिक दबावाचा परिणाम करणारे निर्णय घेत असतात.

Doland Trump Company
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील वाळूची तस्करी, महसूल विभाग करतो तरी काय नागरिकांचा सवाल

या गुंतागुंतीच्या परस्परसंबंधांच्या दरम्यान, ट्रम्पच्या बिझनेस ग्रुपने भारतात मोठ्या पातळीवर गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप कॉर्पोरेशनचे संचालक एरिक स्विडर यांनी तेलंगणात फ्युचर सिटी आणि इतर प्रोजेक्ट्समध्ये ₹1 लाख कोटींपर्यंत गुंतवणुक करण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. स्विडर हे ट्रुथ सोशलचे संस्थापक सीईओ देखील आहेत. त्यांनी भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आव्हाने आणि संधींबाबत बोलताना भारताचा वेगवान विकास आणि जगातले नेतृत्व यावर भर दिला आहे.

Doland Trump Company
Ambadas Danve: अंबादास दानवे यांच्या कॅशबॉम्बवर शिवसैनिकांमध्ये संताप, रायगडात ठिकठिकाणी निषेध

एरिक स्विडर यांनी सांगितले की, भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अपार संधी आहेत आणि भारताची प्रगती थांबविणे अशक्य आहे. भारताने या क्षेत्रात केलेली प्रगती जगाने मान्य केली असून तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीने भारतात ही भव्य गुंतवणूक केली असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर याला मोठ्या लक्षात घेतले गेले आहे. मागील काही वर्षांत भारतात तंत्रज्ञान विकासाच्या वेगाने अनेक देश भारतामध्ये गुंतवणूक करण्यास उद्युक्त झाले आहेत, आणि आता ट्रम्प ग्रुपसारख्या मोठ्या संस्थांनीही भारतीय बाजारपेठीत आपली पाय पुजरण्यास सुरवात केली आहे.

Doland Trump Company
Mumbai Weather: मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल! वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com