Iran-Israel War
Iran-Israel War

Iran-Israel War : इराण - इस्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दुतावासाचे कतारमधील भारतीय नागरिकांना आवाहन

इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Iran-Israel War ) इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा मोठा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे, कारण कतारमध्ये सुमारे 7 लाख भारतीय राहतात.

इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डने हा हल्ला वॉशिंग्टनच्या अणु-सुविधांवरील संभाव्य आक्रमणाच्या प्रत्युत्तरादाखल केला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भविष्यात इराणच्या सार्वभौमत्वाविरुद्ध कोणतेही पाऊल उचलल्यास कडक उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला आहे. हल्ल्यानंतर दोहा शहरात स्फोटाचा आवाज ऐकू आला, आणि हवाई क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय करण्यात आली.

Iran-Israel War
Iran On Donald Trump Ceasefire Announcement : ट्रम्प यांच्या युद्धविराम घोषणेनंतर इराणची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले, "कोणताही करार झालेला नाही..."

या पार्श्वभूमीवर, दोहामधील भारतीय दूतावासाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी शक्यतो घरात राहावे, शांतता बाळगावी व स्थानिक प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, इराणने इराकमधील तळांवरही हल्ला केला असून, कुवेत आणि बहरीनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा उपाय म्हणून कतारने तात्पुरते हवाई क्षेत्र बंद केले असून, अनेक विमाने वळवण्यात आली आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com