Pakistan-Bangladesh
PAKISTAN-BANGLADESH DEFENSE PACT: INDIA’S SECURITY AT STAKE

Pakistan Bangladesh: भारतापुढे सर्वात मोठं संकट, पाकिस्तान रचतोय भयंकर कट, बांगलादेशला सोबत घेऊन…

India Security: पाकिस्तान आणि बांगलादेश दरम्यान संरक्षण कराराच्या चर्चांमुळे भारताची चिंता वाढली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पाकिस्तान लवकरच काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पाकिस्तान बांगलादेशलाही सोबत घेत आहे. लवकरच या दोन्ही देशांत एक मोठा करार होणार आहे. हा करार प्रत्यक्षात झाला तर भारताला फटका बसू शकतो.

Pakistan-Bangladesh
CM Devendra Fadnavis: 'महाविकास आघाडीचा विचार केला तर...', नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक देश आपल्या व्यापाराचा विस्तार कसा होईल? जगभरातून देशात कशी गुंतवणूक येईल? यासाठी प्रयत्न करत आहे. सोबतच आपल्या देशाची सुरक्षा अबाधित राहावी यासाठीदेखील अनेक देश लष्कराला बळ पुरवत आहेत. आपल्या सोईच्या देशांसोबत अनेक देश संरक्षणविषयक करार घडवून आणत आहेत. असे असतानाच आता भारताची चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. पाकिस्तान एक मोठा सैन्यविषयक करार घडवून आणत असून याचा भारताला भविष्यात फटका बसू शकतो.

Pakistan-Bangladesh
Palghar Crime: बोईसर बस डेपो परिसरात भर दिवसा गांजा विक्री; पोलिसांकडून महिलेला अटक, ३ किलो गांजा जप्त

पाकिस्तान नेमकं काय करू पाहतोय?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एक महत्त्वाचा संरक्षणविषयक करार होणार आहे. त्या दिशेने दोन्ही देश पावलं टाकत आहेत. या संरक्षण कराराअंतर्गत दोन्ही देश एकमेकांना लष्करी पातळीवर सहकार्य करण्यास वेगळी दिशा मिळणार आहे. सध्यातरी दोन्ही देश या करारावर चर्चा करत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि लष्करी अधिकारी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर आता या दोन्ही देशांत संरक्षण करार होत असल्याचे समोर आले आहे. कराराविषयीचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र्र मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. या करारासाठी ड्राफ्ट तयार केला जात असून लवकरच त्याला अंतिम स्वरुप मिळणार आहे.

Pakistan-Bangladesh
Vladimir Putin: रशियाला मोठा धक्का! व्लादिमीर पुतिन यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीवर भीषण बॉम्बहल्ला, युद्ध भडकण्याची भीती

भारताला नेमका काय फटका बसणार?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या जरी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात संरक्षणविषय करार होत असला तरी सध्यातरी या कराराला प्रत्यक्ष रुप मिळण्याची शक्यता कमी आहे. लवकराच बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ही निवडणूक झाल्यानंतर तिथे नव्या सरकारची स्थापना होईल. त्यानंतरच पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील कराराला अंतिम स्वरुप मिळू शकते. हा करार अस्तित्त्वात आला तर पाकिस्तानचे बळ वाढू शकते. तसेच पाकिस्तानचे बळ वाढले तर त्याचा फटका भारताला बसू शकतो. त्यामुळे भविष्यात नेमके काय काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com