Gift For Putin: व्लादिमीर पुतिन यांचं खास स्वागत! पीएम मोदींकडून पुतिन यांना एअरपोर्टवर ‘स्पेशल गिफ्ट’
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचे भारतात आगमन झाले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. खास पद्धतीने पुतिन यांचे स्वागत करण्यात आले.
पुतिन यांच्या भारत दौऱ्याचे खास नियोजन करण्यात आलंय. प्रत्येक बारीक गोष्टीचे लक्ष ठेवण्यात आले. फक्त पुतिन हेच नाही तर त्यांच्यासोबत रशियाचे तब्बल सात मंत्री भारताच्या दौऱ्यावर आहेत. रात्री नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी एकत्र डिनर केले. काही मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. भारत आणि रशियात काही महत्वाचे करार होणार आहे. पुतिन यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. अमेरिका भारतावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी न करण्यासाठी मोठा दबाव टाकत आहे. त्यामध्येच पुतिन थेट भारत दौऱ्यावर पोहोचले आहेत.
युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. चार वर्षांनंतर पुतिन अशावेळी भारत दौऱ्यावर आहेत, ज्यावेळी भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे संबंध एका वाईट वळणावर आहेत. भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. 2021 मध्ये यापूर्वी पुतिन भारत दौऱ्यावर आले होते.
पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची भेट 2024 मध्ये मॉस्कोमध्ये झाली होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा शेवटचा भारत दौरा 6 डिसेंबर 2021 रोजी होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन विमानतळावर दाखल होताच नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना मोठे गिफ्ट देत त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भेटवस्तू म्हणून रशियन भाषेत लिहिलेली भगवतगीता दिली. पुतिन यांनीही मोदींचे हे गिफ्ट आनंदाने स्वीकारले.
काळा सूट आणि बूट घातलेले पुतिन विमानातून बाहेर पडताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आश्चर्यचकित केले आणि मोठे सरप्राईज दिले. पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉल तोडून त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. नरेंद्र मोदी यांना बघताच पुतिन यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. हेच नाही तर विमानतळावर दाखल होताच दोघांनीही आनंदाने एकमेकांची गळाभेट घेतली. काही दिवसांपूर्वीच पुतिन आणि नरेंद्र मोदी यांची भेट चीनमध्येही झाली होती. दोघांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला होता.
पंतप्रधान मोदींनी विमानतळावर स्वतः जाऊन पुतिन यांचे विशेष स्वागत केले आणि त्यांना रशियन भाषेतील भगवद्गीता भेट दिली.
दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली आणि लगेचच खास डिनरदरम्यान प्राथमिक चर्चा झाली.
पुतिन यांच्यासोबत सात रशियन मंत्री भारत दौऱ्यावर असून उच्चस्तरीय करारांची शक्यता आहे.
