Indigo Flights: २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! अमोल कोल्हे म्हणाले...
देशातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर ऑपरेशनल अडचणींना सामोरे जात आहे. गुरुवारी कंपनीने तब्बल ५५० उड्डाणे रद्द केली. हा तिच्या २० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा आकडा ठरला. दररोज साधारण २३०० उड्डाणे करणाऱ्या इंडिगोची वक्तशीरता बुधवारी फक्त १९.७% इतकी घसरली, जी मंगळवारच्या ३५% पेक्षा मोठी घसरण आहे.
इंडिगोने इशारा दिला आहे की पुढील दोन–तीन दिवसांतही उड्डाणांमध्ये अडथळे कायम राहू शकतात. केबिन क्रूची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात सेवा बाधित होत आहेत. परिस्थिती सामान्य करण्यासाठी एअरलाइनने उड्डाणांचे वेळापत्रक बदलत अनेक नियोजित सेवा रद्द केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ठ शेअर केली आहे.
अमोल कोल्हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले की, देशांतर्गत विमानसेवेच्या 'सावळ्या गोंधळा'मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या 'निवांत वेळेत' एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..!
इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती…
यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..!
जय शिवराय
इंडिगोने एका दिवसात ५५० उड्डाणे रद्द केली
ऑपरेशनल अडचणी, तांत्रिक समस्या आणि क्रू कमतरता वाढत्या व्यत्ययाचे मुख्य कारण.
अमोल कोल्हे यांच्या फ्लाईटला दोन तास उशीर आणि नंतर रद्द; त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
