IndiGo Flights Cancelled
IndiGo Flights Cancelled

IndiGo Flights: प्रवाशांचे हाल! इंडिगोची अडचणी सुरुच, ८ विमानतळांवर 100 पेक्षा अधिक फ्लाइट्स रद्द

IndiGo Flights Cancelled: इंडिगो एअरलाइन्सच्या तांत्रिक बिघाड, क्रू कमतरता आणि खराब हवामानामुळे देशभरातील ८ विमानतळांवर १०० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भारतीय विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. कारण देशभरातील अनेक विमानतळांवरील त्यांच्या उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत. गुरुवारी म्हणजेच आज ४ डिसेंबर २०२५ रोजी १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय भासत आहे. काही उड्डाणे तांत्रिक समस्यांमुळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काहींना क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. या कारणामुळे अनेक प्रवासी तासनतास विमानतळावर थांबले होते, पण शेवटच्या क्षणी त्यांचे विमान रद्द होण्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला.

IndiGo Flights Cancelled
EPFO Update: EPFO पगार मर्यादा वाढणार ₹३०,००० पर्यंत; कर्मचार्‍यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार

गुरुवारी हैदराबाद आणि दिल्ली विमानतळांवर प्रवाशांच्या लांब रांगाही पाहायला मिळाल्या. मात्र इंडिगोच्या या विभागातील चुका आणि व्यवस्थापनाविरुद्ध नाते सोशल मिडियावरही प्रचंड आक्षेप नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्याचा आलेख आहे. बेंगळुरु येथे ४२, दिल्लीमध्ये ३८, अहमदाबादमध्ये २५, इंदूरमध्ये ११, हैदराबादमध्ये १९, सुरतमध्ये ८, आणि कोलकातामध्ये १० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

इंडिगो एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी मान्य केले की, खराब हवामान, सिस्टीममधील बिघाड आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या नियमांमुळे उड्डाणांवर परिणाम झाला आहे. कंपनीने प्रवाशांबद्दल दिलगीर व्यक्त केली आहे आणि पुढील ४८ तासांत विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत करण्याचा आश्वास दिला आहे.

IndiGo Flights Cancelled
Cyber Security: सरकारचा नवा नियम! मोबाईलमधून सिमकार्ड काढताच WhatsApp, Snapchatसह अनेक मेसेजिंग अ‍ॅप होणार बंद

मॅन्युअल चेक-इन प्रक्रियेमुळे प्रवाशांना अतिरिक्त २५ ते ४० मिनिटे लागू लागतात. जेणेकरून सामान सोडणे आणि सुरक्षा तपासणी देखील उशिराने होत आहे. एकंदर पाहता, इंडिगोच्या सिस्टीममध्ये झालेल्या बिघाडामुळे उड्डाणांवर मोठं प्रभाव पडला आहे आणि प्रवाशांसमोर गैरसोयीचे वनदिशा खुले झाले आहेत.

Summary
  • इंडिगोने ८ विमानतळांवर १०० हून अधिक उड्डाणे रद्द केली.

  • तांत्रिक बिघाड, क्रू कमतरता आणि हवामान ही प्रमुख कारणे सांगितली.

  • प्रवाशांना तासनतास रांगेत थांबावे लागल्याने मोठी गैरसोय झाली.

  • इंडिगोने ४८ तासांत सेवा सामान्य करण्याचे निवेदन जारी केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com