Salim Ghouse Passes Away Team Lokshahi
मनोरंजन
Salim Ghouse Passes Away : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सलीम घोष यांचे निधन
अभिनेते सलीम घोष (७०) यांचे मुंबईत गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अभिनेते सलीम घोष (७०) यांचे मुंबईत गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. काल रात्रीपर्यंत सलीम यांची प्रकृती ठीक होती. नेहमीप्रमाणे सर्व दैनंदिन कामे आटोपून जेवल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यानंतर त्यांना कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे निदान केल्याची माहिती त्यांच्या पत्नी अनिता (Anita) यांनी दिली.
मार्शल आर्ट्समध्ये तरबेज सलीम यांचा जन्म आणि शिक्षण चेन्नईमध्ये (Chennai) झाले होते. मंथन, चक्र, कलयुग, कोयला, सोल्जर, बादल, इंडियन, रेड, वेल डन अब्बा या गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.