विजय देवरकोंडाच्या आईसह पुजा करताना दिसली अनन्या पांडे: पाहा फोटो

अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्या आणि विजय या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच हे दोघंही प्रमोशनसाठी हैदराबाद येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी विजय देवरकोंडांच्या घरी पुजा देखील केली. विजयच्या आईने या पुजेचं आयोजन केलं होतं.
Published by :
Siddhi Naringrekar

अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्या आणि विजय या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच हे दोघंही प्रमोशनसाठी हैदराबाद येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी विजय देवरकोंडांच्या घरी पुजा देखील केली. विजयच्या आईने या पुजेचं आयोजन केलं होतं.

अनन्याने पूजेचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विजयची आईसुद्धा दिसत आहे. अनन्याने हे फोटो शेअर करुन “विजयच्या आईचे आशीर्वाद घेतले. त्याच्या घरी पुजाही केली. धन्यवाद आंटी.” असे कॅप्शन देखिल दिले आहे.

अनन्याने शेअर केलेले हे फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. ‘लायगर’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे

विजय देवरकोंडाच्या आईसह पुजा करताना दिसली अनन्या पांडे: पाहा फोटो
“हा चिखल आपणही दागिन्यासारखा मिरवू…” असे म्हणत प्रवीण तरडेंचा शेती करतानाचा व्हिडिओ पाहा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com