Tanushree Dutta
Tanushree DuttaTeam Lokshahi

अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या कारचा अपघात

तनुश्री दत्ताच्या अपघाताचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
Published by :
Published on

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची (Bollywood Actress Tanushree Dutta) अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून तनुश्री वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आलेली सेलिब्रेटी आहे. मधल्या काळात ती ‘मी टू’ (Me too) चळवळीमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली होती. तिने प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर(Nana Patekar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लिन चीट मिळाली.

Tanushree Dutta
भूमी पेडणेकरचा आत्तापर्यंतचा सर्वात हटके लूक...

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तनुश्री दत्ताला अपघात झाल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तिची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले आहे. याची माहिती स्वतः तनुश्रीनं तिच्या सोशल मीडिया (Social Media) हॅन्डलवरून दिली आहे. तिने इनस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत या दुर्घटनेबद्दल सांगितलं आहे. तनुश्रीच्या पायाला दुखापत झाली आहे. कारचे ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.

Tanushree Dutta car accident
Tanushree Dutta car accidentTeam Lokshahi

तिनं शेयर केलेल्या पोस्टमध्ये (post) म्हटले आहे की, 'शेवटी महादेवानं दर्शन दिले आहे. पण मंदिरातून परतत असताना एक विचित्र अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानं माझी कार बिघडली आणि माझ्या पायाला दुखापत झाले. काही टाके पडले आहे. जय श्री महाकाल.’ या फोटोंमध्ये अभिनेत्री पायाला मोठी दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. तनुश्री दत्ताच्या चाहत्यांनी तिच्या त्या पोस्टवर कमेंट करुन तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे.

Tanushree Dutta
भूमी पेडणेकर होणार ‘पत्रकार’

2005 मध्ये तनुश्रीनं बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi) तिनं आशिक बनाया अपनेतून पदार्पण केलं होतं. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com