‘दिल्ली क्राइम 2’ ला मिळतोय प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
Admin

‘दिल्ली क्राइम 2’ ला मिळतोय प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

दिल्ली क्राईम’ या सिरीजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. दिल्ली क्राईमला पसंती मिळाल्यानंतर आता ‘दिल्ली क्राईम 2’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. अखेर दिल्ली क्राइमचा सिझन 2 नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांतच या सिझनने ओटीटीवर धुमाकूळ घातला.
Published by :
Siddhi Naringrekar

दिल्ली क्राईम’ या सिरीजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. दिल्ली क्राईमला पसंती मिळाल्यानंतर आता ‘दिल्ली क्राईम 2’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. अखेर दिल्ली क्राइमचा सिझन 2 नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांतच या सिझनने ओटीटीवर धुमाकूळ घातला.

या सीझनमध्ये काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये सक्रिय झालेल्या चड्डी बनियन गँगचा गुन्हा उलगडण्यात आलेला आहे. ही टोळी रात्रीच्या वेळी घरात घुसून धारदार शस्त्राने लोकांची निर्घृण हत्या करत असत. या कुप्रसिद्ध गँगचा थरार दिल्ली क्राईम सीझन 2मध्ये पाहायला मिळणार आहे. पोलिसांनी कशाप्रकारे सापळा रचला, त्याआधी या गँगने कशाप्रकारे गुन्हे केले. वारंवार ही गँग का निसटायची, पोलीस-चड्डी बनियन गँगमधलं हे थरारनाट्य नेटफ्लिक्सवर पाहायला मिळतंय. दिल्ली क्राईम सीझन 2 च्या ६ एपिसोड्समध्ये पाहायला मिळत आहेत.

डीसीपी वर्तिका सिंगच्या भूमिकेत पुन्हा एकदा शेफाली शाह, तर त्यांच्या टीममध्ये रसिका दुग्गल, राजेश तैलंग, आदिल हुसैन, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज आणि गोपाल दत्त हे कलाकार पुन्हा दिसत आहेत.

‘दिल्ली क्राइम 2’ ला मिळतोय प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
गुलाबी केस, मस्तानी चाल... निया शर्माचे लेटेस्ट फोटोशूट पाहाच
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com