गौतमी पाटीलचे वडील बेवारस अवस्थेत सापडले धुळ्यात; प्रकृती गंभीर

गौतमी पाटीलचे वडील बेवारस अवस्थेत सापडले धुळ्यात; प्रकृती गंभीर

गौतमी पाटीलचे वडील बेवारस अवस्थेत धुळ्यात सापडले. सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले.
Published on

उमाकांत अहिरराव | धुळे : लावणी डान्सर गौतमी पाटीलने अख्ख्या महाराष्ट्राच्या तरुणाईला वेड लावले आहे. गौतमी पाटील अनेकदा वादामुळेच जास्त चर्चेत असते. अशातच, पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलचे वडील बेवारस अवस्थेत धुळ्यात सापडले. सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले. ही बातमी समजताच नातेवाईक धुळ्यात दाखल झाले आहे. मात्र, गौतमी पाटीलकडून अद्यापही वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आलेली नाही.

गौतमी पाटीलचे वडील बेवारस अवस्थेत सापडले धुळ्यात; प्रकृती गंभीर
दादांना कोणी गद्दार बोलत नाही किती दहशत; गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी

माहितीनुसार, गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील हे धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरत बायपास रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांना ते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आढळून आले.

सुरत बायपास रस्त्यावर अज्ञात व्यक्ती मृताअवस्थेत पडलेला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली होती. हे सामाजिक कार्यकर्ते सदर व्यक्ती जवळ पोहोचले असता त्यांचा श्वास सुरू असल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ या व्यक्तीस शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

त्यानंतर सदर व्यक्ती कोण यासंदर्भात माहिती घेण्यासाठी या सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फोटो व पोस्ट व्हायरल केली असता, संबंधित व्यक्ती हे गौतमी पाटीलचे वडील असल्याचे उघडकीस आले. गौतमी पाटीलच्या वडिलांची अशी दयनीय अवस्था समजल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गौतमी पाटील हिने पाटील आडनाव लावू नये यावरून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर तिच्या वडिलांची प्रतिक्रियाही समोर आली होती. यावेळी गौतमीने मला येऊ भेटावं, तिने मला पप्पा म्हणून हाक मारावी, अशी इच्छाही व्यक्त केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com