Gautami Patil Movie ; गौतमी पाटीलचा 'घुंगरु' चित्रपट प्रदर्शनाची तारीख लांबणीवर, कारण?
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. अश्यातच गौतमीला मराठी सिनेसृष्टितील एका चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली आहे. मात्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा फटका आता गौतमी पाटीलला सुद्धा पडला आहे. मुख्य भूमिकेत असलेला गौतमी पाटीलचा 'घुंगरू' या चित्रपटाची प्रदर्शिणाची तारीख लांबणीवर गेली आहे.
सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या राजकीय घडामोडीमुळे प्रदर्शित तारीख पुढे ढकलली असल्याच 'घुंगरू' चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी सांगितलं आहे. सोबतच पुढील आठ दिवसांत घुंगरू चित्रपटाची प्रदर्शित तारीख घोषित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झळकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांनी पहिल्या आहेत. अशात आता गौतमिचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.