Kedar Shinde : एक दरवाजा बंद होतो, तेव्हाच दुसरा.... , केदार शिंदेची पोस्ट चर्चेत
लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी चित्रपट आणि नाटकांच्या दिग्दर्शनांतून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. सध्या त्यांचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shaheer) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट लोकप्रिय कलाकार शाहीर साबळे यांच्यावर आधारित आहे. केदार शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. तसेच मागे त्यांनी पत्नीसाठी एक पोस्ट केली होती. ती पोस्ट त्यांच्या लग्नाला 26 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने केली होती. ही पोस्ट प्रचंड चर्चेत होती. पण सध्या त्यांची सोशल मीडियावर अजून एक पोस्टने त्यांच्या चाहत्यावर्गांचे लक्ष वेधले आहे.
केदार शिंदे सतत सोशल मीडियावर (Social Media) व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत पोस्ट शेअर करत असतात. प्रत्येक विषयावर केदार शिंदे परखड मत मांडत असतात. नुकताचं त्यांनी त्यांच्या इंटाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. आणि त्याला सुंदर असे कॅप्शन लिहिले आहे.
केदार शिंदे यांची इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टला दिलेले कॅप्शन असे आहे की, 'श्री स्वामी समर्थ महाराज की जय... काही निर्णय स्वामींवर सोपवून द्यायचे. कारण एक दरवाजा बंद होतो, तेव्हाच दुसरा दरवाजा उघडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. विश्वास हवा. त्यांच्यावर आहेच, स्वत:वर विश्वास हवा'.
केदार शिंदे यांच्या या पोस्टला (Post) चाहत्यांबरोबर अनेक कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. आणि त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आहेत.