VIRAJAS KULKARNI
VIRAJAS KULKARNI

विराजस अन् शिवानी अडकणार विवाहबंधनात

Published by :
Saurabh Gondhali
Published on

महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी MRUNAL KULAKARNI यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी VIRAJAS KULKARNI व अभिनेत्री शिवानी रांगोळे SHIVANI RANGOLE विवाह बंधनात अडकणार आहेत. मृणाल कुलकर्णी या प्रसिद्ध अभिनेत्री असून नुकताच त्यांचा पावनखिंड हा चित्रपट येऊन गेला. यामध्ये त्यांनी राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली आहे. आगामी काळामध्ये त्यांचा शेर शिवराज हा चित्रपट येणार आहे.

VIRAJAS KULKARNI
रणबीर-आलियाच्या लग्नाचे विधी लवकरच सुरू होणार, लग्नस्थळी आलेल्या पाहुण्यांचे फोटो

विराजस हा एक अभिनेता असून त्याने गेल्याच वर्षी मालिका क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. त्याची माझा होशील ना ही मालिका खूप गाजली. तर शिवानी ही सुद्धा आणि सीरियल्स मधून घराघरात पोहोचली आहे. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता रसिक प्रेक्षक त्यांच्या विवाह सोहळ्याची वाट पाहत आहेत.

VIRAJAS KULKARNI
कांस्टिग काऊच उघड करत अभिनेत्री म्हणाली, निर्मात्यासोबत तुला एकांतात....

अलिकडेच शिवानी आणि विराजसने एका जाहिरातीसाठी लग्नाचा सीन शूट केला होता. तेव्हा त्यांनी गुपचूप लग्न केलं की काय,अशा चर्चांना खुप उधाण आलं होतं. पण जाहिरातीचं शूटींग म्हणजे त्यांच्या ख-या लग्नापूर्वीची एक रंगीत तालीमच म्हणावी लागेल. कारण पुढच्या महिन्यात ते लग्न करणार आहेत. ते बरीच वर्षे एकमेकांना ओळखतात. त्यांच्या घरच्यांमध्येही उत्तम संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी विराजसने शिवानीला गोल्ड रिंग देऊन प्रपोस केलं होतं. त्यासाठी त्याने एक सरप्राईस प्लॅन केला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com