suraj Pawar
suraj Pawar Team Lokshahi

सैराट मधील प्रिन्सला होणार अटक, फसवणुकीचा आरोप

मंत्रालयात नोकरीला लावण्याचे अमिष
Published by :
Sagar Pradhan

अहमदनगर जिल्ह्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीत विशेष बाब म्हणजे या प्रकरणात नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटातील प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक देखील करण्यात आलीय.

suraj Pawar
उत्तर प्रदेशातील दोन मुलींचे मृतदेह शेतामध्ये झाडावर आढळले; शरीरावर एकही जखम नसल्याचं पोलिसांचं मत!

मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रूपयांची संशयितांकडून मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे या प्रकरणी आता सुरज पवार याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. दत्तात्रय क्षिरसागर ( रा. नाशिक ), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी आरोपींवर कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

suraj Pawar
'...तेव्हा राज ठाकरेंनी मित्रांनाच काय तर भावाला पण सोडले नाही'

पोलीस आता लवकरच सुरज पवारला ताब्यात घेऊन यात रॅकेट आहे का याचा तपास करणार आहेत, अशी माहिती राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. दरम्यान, नोकरीचे आमिष दाखवून कोणाची फसवणूक झाली असेल तर अशा तरुणांनी न घाबरता राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन राहुरी पोलिसांनी केल आहे.

या चित्रपटात केले आहे सुरज पवारने काम

बस्ता (2021), सैराट (2016), नाद (2014),फॅन्ड्री (2013), पिस्तुल्या (2009) या चित्रपटात त्यानी भूमिका पार पडल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com