Sunny LeoneTeam Lokshahi
मनोरंजन
ट्रेंडींग गाण्यावर सनीचा हटके डान्स; व्हिडिओ व्हायरल
नुकतंच सनी लिओनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, ती एका ट्रेंडींग गाण्यावर डान्स करत आहे.
‘बेबी डॉल’ सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती तिच्या खाजगी आणि व्यवसायिक आयुष्यातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सनीचा चाहतावर्गही खूप आहे. सनीला ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने खूप प्रसिद्धी दिली आहे. नुकतंच सनी लिओनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, ती एका ट्रेंडींग गाण्यावर डान्स करत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सनी लिओनी ‘पतली कमरिया मोरी हाय हाय’ या ट्रेंडींग गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच या गाण्यांने तरुणांना वेड लावले आहे. आता याच गाण्यावर सनीही हटके डान्स करताना दिसत आहे. यावेळी सनीने भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.