Rajinikanth
RajinikanthTeam Lokshahi

रजनीकांत का मानतात अमिताभला गुरू; जाणून घ्या कारण

रजनीकांत आणि 'बिग बी' अमिताभ बच्चन' या दोघांमध्ये अगदी चांगली मैत्री
Published by :
Published on

सुपरस्टार रजनीकांत(Superstar Rajinikanth)हे नाव प्रत्येक दाक्षिणात्य सिनेप्रेक्षकांमध्ये अगदी मानाचे स्थान म्हणून ओळखले जाते. रजनीकांतने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. काही चित्रपटांमुळे तो सुपरस्टार जरी ठरला असला तरी त्याच्या आयुष्यात त्याने अशा काही चित्रपटांमध्ये काम केले होते की त्या चित्रपटांमुळे त्याला स्वतःचे करिअर गमावण्याची वेळ देखील आली होती. मात्र ती वेळ एका व्यक्तीमुळे बदलली होती. आता ती व्यक्ती कोण असा देखील प्रश्न अनेकांना पडला असावा

तर ती व्यक्ती दुसरी कुणी नसून बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन ( amitabh bachchan) हे आहेत

Rajinikanth
‘प्रार्थना बेहेरे'च्या पैठणी नेसलेल्या फोटोज वर चाहते घायाळ...

रजनीकांत आणि 'बिग बी' अमिताभ बच्चन' या दोघांमध्ये अगदी चांगली मैत्री असल्याचं देखील अनेकदा म्हटलं जातं. रजनिकांतने आजवर अमिताभच्या 11 चित्रपटांचे तमिळ (Tamil) रिमेक केलेले आहे. या चित्रपटांच्या रिमेक नंतर त्याचं करिअर अगदी यशस्वीपणे वरच्या टोकाला आलं होतं.

ज्या चित्रपटाचा रजनीकांतला भरपूर प्रमाणात फायदा झाला तो म्हणजे 1978 साली रिलीज झालेला अमिताभ बच्चनचा 'डॉन' (Don) हा चित्रपट. या चित्रपटाचं लेखन सलीम-जावेद (Salim Khan) यांनी केलेलं आहे.

1978 साली रिलीज झालेल्या 'डॉन' या चित्रपटाचं तमिळ रिमेक म्हणून 1980 साली 'बिल्ला' (Billa) हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात रजनिकांतने डबल रोल केला आहे. हा चित्रपट कमर्शिअल लेव्हलवर देखील हिट ठरला होता. 'बिल्ला' या चित्रपटामुळे रजनीकांतच्या आयुष्यात एक यशाचं वळण आलं होतं. काहीं विरोधकांनी रजनीकांतच्या करिअरचा शेवट झाला असं देखील म्हटलं होतं. परंतु रजनिकांतच्या विरोधकांच्या टीकेचं हे प्रत्युत्तर असावं कदाचित. अमिताभ यांच्याकडून मला काहीतरी मिळालं आणि जे मिळालं ते माझ्याकरिता हितकारक ठरलं असं देखील रंजीकांत यांनी काहीवेळा म्हटलेलं आहे.

Rajinikanth
शिवानी-विराजसच्या विवाहाचे फोटो पाहिलेत का?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com