TMKOC : नवीन नट्टू काकांची झाली एन्ट्री, 'हा' अभिनेता साकारणार भुमिका
14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (taarak mehta ka ooltah chashmah) या कॉमेडी मालिका प्रत्येक घराघरात पाहिली जाते आहे. ही कॉमेडी मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. जेठालालपासून (Jethalal) ते दयाबेन, हंसराज हाथी, बाघा, बबिता जी, भिडे आणि नट्टू काका (Nattu Kaka) हे सर्वच पात्र प्रेक्षकांचे मनपासून मनोरंजन करताना दिसत आहेत. पण आता या मालिकेमध्ये बरेच बदल होताना दिसत आहेत. या मालिकेमधील जेठालालच्या दुकानात काम करणारे नट्टू काका यांचेही निधन झाले. पण त्यांच्या जागी एकही नवीन चेहरा आलेला नाही. मात्र, आता सर्वांचे लाडके नट्टू काका लवकरच या शोमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांनी नवीन नट्टू काका यांची एन्ट्री होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पुन्हा एकदा नट्टू काका आपल्या खास स्टाइलने प्रेक्षकांना हसवायला येणार आहेत. या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
असित कुमार मोदी पुढे म्हणाले की, हे दुकान पाहिल्यावर सर्वांना नट्टू काकांची आठवण येते. या व्हिडिओमध्ये नट्टू काकांच्या काही जुन्या क्लिप्स दाखवल्या. त्यानंतर असित कुमार मोदी यांनी नवीन नट्टू काका किरण भट्ट (kiran bhatt) यांची ओळख करून दिली. तसेच जुन्या नट्टू काकांनी नवीन नट्टू काकांना पाठवले आहे असे ते म्हणाले. जसे तुम्ही पहिल्या नट्टू काकांना प्रेम दिले तसेच तुम्ही नव्या नट्टू काकांवरही येवढेच प्रेम कराल. त्यानंतर जुने नट्टू काका म्हणजेच धनश्याम नायक यांची आठवण काढत असित मोदी भावूक झाले.