'तिरसाट' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीत आता नवनवीन सुंदर चित्रपटांची निर्मिती होत असताना, आता अजून एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. 'तिरसाट' (Thirsat) हा आगामी चित्रपट येत्या २० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
नीरज सूर्यकांत (Neeraj Suryakant) आणि तेजस्विनी शिर्के (Tejaswini Shirke) ही फ्रेश जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. प्रेमात न पडणाऱ्या लोकांना देखील प्रेमात पडायला लावणारा चित्रपट "तिरसाट" हा आयुष्याला सकारात्मक करणारा असू शकतो असं म्हटलं जात आहे.
"अँटमगिरी" या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रदीप टोणगे (Pradeep Tonge) आणि मंगेश शेंडगे (Mangesh Shendge) आता "तिरसाट" हा चित्रपट घेऊन येत आहेत. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला असून नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे.
दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सने "तिरसाट" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच उमेश शेडगे हे या चित्रपटाचे सहनिर्माते असून निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. पी.शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आणि चित्रपटाचे संकलन मंगेश जोंधळे यांनी केले आहे.