Crime News | TV Actor | Rashmirekha Ojha
Crime News | TV Actor | Rashmirekha OjhaTeam Lokshahi

TV Actor : अभिनेत्रीने उचलले टोकाचे पाऊल, वडिलांना हत्येचा संशय

अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल
Published by :
Shubham Tate
Published on

Rashmirekha Ojha : ओडिशातील लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मिरेखा ओझा येथील नयापल्ली भागात असलेल्या तिच्या भाड्याच्या घरात तिचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. ओझा यांच्या वडिलांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलीच्या मृत्यूमध्ये त्यांचा लिव्ह-इन पार्टनर संतोष पात्रा यांचा हात आहे. (tv actor found dead rented home in odisha family accuses live in partner)

Crime News | TV Actor | Rashmirekha Ojha
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने 'फादर्स डे' निमित्त शेअर केला मुलीचा फोटो

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसंदर्भात अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले, '23 वर्षीय अभिनेत्री 18 जूनच्या रात्री तिच्या भाड्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. पोलीस त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "प्रथम दृष्टया हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते कारण अभिनेत्रीने तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, अशी चिठ्ठी लिहली आहे." ओझा यांच्या वडिलांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांना मुलीच्या मृत्यूची बातमी संतोष पात्रा यांच्याकडून मिळाली. शनिवारी आमचा एकही फोन उचलला गेला नाही. नंतर संतोषने आम्हाला माहिती दिली. संतोष आणि रश्मी पती-पत्नी म्हणून राहत असल्याचे आम्हाला घरमालकाकडून समजले. आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com