हळद अशा प्रकारे लावा चेहऱ्यावर; येईल सोन्यासारखी चमक
Haldi Benefits : हळदीच्या त्वचेला उजळ करणाऱ्या गुणधर्मांबद्दल आपण सर्वांनी कधी ना कधी आपल्या आजींकडून ऐकलेच असेल. परंतु, आपण अद्याप आपल्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येत त्याचा समावेश केला आहे का? क्युरक्यूमिनॉइड्समध्ये क्युरक्यूमिन डेमेथॉक्सीक्युरक्यूमिन, डायहाइड्रोक्युरक्यूमिन आणि 5-मेथोक्सीक्युरक्यूमिन यांचा समावेश होतो. हे नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहेत. हे सर्व पोषक घटक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. चला जाणून घेऊया हळदीशी संबंधित आणखी खास माहिती.
हळदीचे फायदे
1. तुम्ही एक ग्लास पाणी घ्या, त्यात एक चमचा हळद मिसळा आणि पाणी उकळा. नंतर ते थंड करा आणि या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग हलके होण्यास सुरुवात होईल आणि येणारा ग्लो वेगळाच असेल.
2. या पाण्याने चेहऱ्यावरील खाज, जळजळ आणि पुरळ देखील कमी होईल. तुम्ही हे पाणी तुमच्या स्किन केयर रूटीन बनवा. चेहऱ्यावरील सर्व प्रकारच्या अॅलर्जी कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे.
3. याशिवाय हे हळदीचे पाणी मुरुमे दूर करण्यासाठी देखील गुणकारी आहे. शिवाय, हट्टी डाग देखील हळूहळू हलके होऊ लागतात. त्यामुळे आजपासून या पाण्याने खराब झालेली त्वचा सुधारण्यास सुरुवात करा.
४. दोन चमचे चंदन आणि हळद आणि गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. त्यानंतर हा पॅक 20 ते 25 मिनिटे हातावर लावून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने हात मऊ आणि चमकदार होतील.