घरीच बनवा पेरूचा फेस पॅक; मिळेल इंस्टेंट ग्लो

घरीच बनवा पेरूचा फेस पॅक; मिळेल इंस्टेंट ग्लो

चमकती त्वचा मिळविण्यासाठी, तुम्ही अनेक प्रकारचे फ्रूट मास्क किंवा पेरूसारखे फेस पॅक वापरू शकता. आपण घरच्या घरी पेरूचा फेस पॅक कसा बनवू शकता. कसं ते जणून घ्या.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Guava Face Pack: आपली त्वचा सोन्यासारखी चमकावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा त्वचेसाठी तुम्ही अनेक हर्बल फेस मास्क वापरू शकता. चमकती त्वचा मिळविण्यासाठी, तुम्ही अनेक प्रकारचे फ्रूट मास्क किंवा पेरूसारखे फेस पॅक वापरू शकता. आपण घरच्या घरी पेरूचा फेस पॅक कसा बनवू शकता. कसं ते जणून घ्या.

घरीच बनवा पेरूचा फेस पॅक; मिळेल इंस्टेंट ग्लो
केसांना करा केमिकल फ्री कलर; जाणून घ्या 'ही' सोप्पी पद्धत

पेरूचा फेस पॅक घरी कसा बनवायचा?

पेरू आणि मधाचा फेस पॅक

पेरू आणि मधाचा फेस पॅक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी अर्धा पिकलेला पेरू घ्या, तो कापून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. याची पेस्ट तयार करा आणि त्यात दोन चमचे शुद्ध मध घालून चांगले मिसळा. आता चेहरा धुवून त्यावर हा फेसपॅक लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. तुमचा चेहरा चमकू लागेल.

पेरू आणि ओटमील फेस पॅक

पेरू आणि ओटमीलचा फेस पॅक बनवू शकता. यासाठी तुम्हाला पेरूच्या पेस्टमध्ये ओटमील मिक्स करून बारीक करावे लागेल. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून काही वेळ तशीच राहू द्या आणि काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा.

पेरू आणि किवी फेस मास्क

पेरू आणि किवी कापून मिक्सरमध्ये मिसळा. त्याची पेस्ट एका भांड्यात ठेवा आणि त्यात थोडे मध टाका, पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने धुवा. त्याचप्रमाणे तुम्ही पेरू आणि काकडी मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. पेरूसोबत तुम्ही किवीऐवजी एवोकॅडो किंवा केळी देखील वापरू शकता, यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक वाढेल.

पेरू आणि मुलतानी माती फेस मास्क

पेरू बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात भिजवलेली मुलतानी माती घाला आणि थोडे गुलाबजल घाला. आता या सर्व गोष्टी पेस्टच्या स्वरूपात तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तास थांबा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com