Winter Health Tips
Winter Health TipsTeam Lokshahi

हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये करा 'या' गोष्टींचा समावेश

हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप आवश्यक असते. कारण बहुतेक लोक हिवाळ्यात आजारी पडतात. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक प्रकारच्या संक्रमणामुळे ताप येण्याची शक्यता असते.

हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप आवश्यक असते. कारण बहुतेक लोक हिवाळ्यात आजारी पडतात. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक प्रकारच्या संक्रमणामुळे ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये डॉक्टरही आपल्या आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यात उत्तम आहार आणि आरोग्यदायी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे गरजेचे असते. ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. तर या लेखातून आपण हिवाळ्यात कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सांगणार आहोत.

शरीर निरोगी आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच दररोज व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी निरोगी आहार करणे खूप आवश्यक आहे. तसेच फळे, भाज्या यांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ईची गरज असते. हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सीची गरज असते. त्यामुळे मोसंबी, लिंबू, किवी, पपई आणि पेरू यांसारखी फळे खाऊ शकता.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला चांगली झोप होणे गरजेचे असते. पुरेशी झोप मिळाल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. त्यामुळे जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा मोबाईल, टॅब किंवा इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर राहणे गरजेचे आहे.

Winter Health Tips
दुधी भोपळ्याच्या रसाचे रोजच्या आहारात करा समावेश होतील 'हे' फायदे

दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहेत. हिवाळ्यामध्ये हळद आणि दालचिनी दुधात मिसळून घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा चमकदार होण्यासाठी मदत करते.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुक्या मेव्याचे सेवन केले जाते. बदाम, पिस्ता, काजू आणि अक्रोड यांसारख्या सर्व ड्रायफ्रुटसमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम यांसारखे घटक असतात. जे आपल्यासाठी फायदेशीर असते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com