Kadai Cleaning
Kadai CleaningTeam Lokshahi

Kitchen Tips : तेलकट-जळक्या कढया झटपट स्वच्छ करण्यासाठी वापरा या घरगुती टिप्स

अॅल्युमिनिअमची कढाई आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे. परंतू स्वयंपाक केल्यानंतर भांडी स्वच्छ करणं हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो.

अॅल्युमिनिअमची कढाई आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे. परंतू स्वयंपाक केल्यानंतर भांडी स्वच्छ करणं हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो. अशावेळी करपलेली, जळलेली जर एखादी कढई असेल तर खूप मोठा ताण महिलांना होता. अशा करपलेल्या भांड्यांना कसं स्वच्छ करायचं हा प्रश्न अनेक गृहिणींनी पडतो. जर तुमची कढई खूप जास्त जळाली किंवा करपली असेल तर या सोप्या पद्धतीने’ तुमची कढई चकचकीत होईल.

कढई कसे स्वच्छ करावे

अ‍ॅल्युमिनियमची भांडी, कुकर किंवा इतर भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण सहसा डिशवॉशिंग साबण किंवा डिशवॉशिंग लिक्विड वापरतो. पण ते पुरेसे नाही, यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी वापराव्या लागतील.


1. पांढरा व्हिनेगर

व्हाईट व्हिनेगर हे नैसर्गिक क्लीन्सर म्हणून काम करू शकते, त्याच्या मदतीने कढईचा, चिकटपणा आणि काळेपणा सहज काढता येतो. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी उकळा आणि नंतर त्यात पांढरा व्हिनेगर आणि लिंबू मिसळून घाण कढई बुडवा. आता कढई बाहेर काढल्यानंतर, स्टीलच्या स्क्रबच्या मदतीने घासून घ्या.

2. बेकिंग पावडर

एक घाण कढई बेकिंग पावडरने साफ केला जाऊ शकतो. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी टाकून ते पूर्णपणे उकळून घ्या आणि नंतर त्यात काही चमचे बेकिंग पावडर आणि मीठ मिसळा आणि ढवळा. आता त्यात कढई बुडवून थोडा वेळ राहू द्या. आता कढई बाहेर काढल्यानंतर स्टीलच्या स्क्रबने हलकेच घासून घ्या. यामुळे स्निग्ध आणि गंजलेला भाग निघून जाईल.

3. लिंबू आणि मीठ

लिंबू आणि मीठामध्ये क्लिंजिंग गुणधर्म आढळतात. एका काळ्या कढईमध्ये पाणी भरून गॅसवर ठेवा. पाणी उकळल्यावर त्यात डिटर्जंट, एक चमचा मीठ टाका आणि त्यात एका लिंबाचा रस पिळून घ्या. नंतर पाणी अधिक उकळण्यासाठी सोडा. यामुळे काळेपणा निघून जाईल. जर कढई मागून घाण झाली असेल तर एका मोठ्या भांड्यात असे पाणी उकळून त्यात घाण कढई टाकावी.

Kadai Cleaning
पायाच्या समस्यांमुळे चिंतीत आहात का? घरगुती उपाय म्हणून या तेलाचा करा वापर...
Lokshahi
www.lokshahi.com