Benefits of Raisins
Benefits of RaisinsTeam Lokshahi

रिकाम्या पोटी मनुके खाण्याचे 'हे' आहेत लाभदायी फायदे

आपल्या निरोगी आरोग्यासाठी ड्राय फ्रुट्स पौष्टिक आणि उपयुक्त असतात. साधारणपणे हिवाळ्यामध्ये मनुकांचं सेवन केले जाते. मनुक्यामध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे.
Published by :
shamal ghanekar

आपल्या निरोगी आरोग्यासाठी ड्राय फ्रुट्स पौष्टिक आणि उपयुक्त असतात. साधारणपणे हिवाळ्यामध्ये मनुकांचं सेवन केले जाते. मनुक्यामध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. मनुके जर तुम्ही रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. भिजवलेले मनुका आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात . मनुका रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने आपल्याला त्याचा फायदाच होतो. तर या लेखातून आपण मनुके खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाण्याचे फायदे :

उच्च रक्तदाबाच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाऊ शकता. त्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यासाठी मदत होते.

तुम्हाला पचनसंस्थेची समस्या जाणवत असेल तर तुमच्या आहारामध्ये मनुक्यांचा समावेश करू शकता. त्याचा तुम्हाला फायदाच होईल. गॅस, अपचन इत्यादी समस्यापासून आराम मिळेल.

अनेकांना केस गळतीची समस्या असते. जर ती समस्या दूर करून केस मजबूत करायचे असतील तर तुम्ही सकाळी मुनक्याचे पाणी पिऊ शकता. त्यामुळे केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते आणि केसांची वाढ होते.

Benefits of Raisins
थंडीत आरोग्यासाठी हिरवे मटार खाणे आहे लाभदायी

भिजवलेल्या मनुकांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपले वाढते वजन नियंत्रणास ठेवण्यास मदत होते.

मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे डोळ्यांच्या जाणवणाऱ्या समस्या, मोतीबिंदू अशा समस्यापासून आपला बचाव केला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com