ऐश्वर्या अन राणीची मैत्री तुटण्यामागचं कारण...
Aishwarya Ray & Rani MukharjiLokshahi Team

ऐश्वर्या अन राणीची मैत्री तुटण्यामागचं कारण...

दोघींच्या मैत्रीमध्ये इतके अंतर कसे निर्माण झाले जे आजवर पुसले गेले नाहीत....

बॉलीवूड(Bollywood)ही केवळ फिल्म इंडस्ट्री नव्हे तर इथे बऱ्याच काही गोष्टींचा संगम आहे. जशी चित्रपट बनतात त्याच प्रमाणे इथं नाती देखील बनतात आणि ती नाती काही क्षणात बिघडवली देखील जातात. सेटवर काम करत असताना कोणाची तरी इतकी घट्ट मैत्री होते की त्याचे उदाहरण दिले जाऊ लागते.

Aishwarya Ray & Rani Mukharji
Cannes 2022 Day 1: दीपिका ते ऐश्वर्या असा होता Cannes लूक

शूटिंग दरम्यान कोणीतरी पहिल्या दृष्टीक्षेपात एकमेकांवर जिव ओवाळून टाकतो. तर कोणीतरी आपल्यासाठी एक चांगल्या जोडीदाराच्या शोधात असतो. परंतु इथं सर्वकाही दिसतं अशातला भाग नाही. कॅमेऱ्याचा ग्लॅमर आणि चकाकीमागील जग ही काहिक्षणी वेगळीच कथा सांगुण जाते. कधी कधी नातं एवढं बिघडायला लागतं की ते कायमचं दुरावतं आणि मित्र देखील काहीवेळा शत्रू बनायला लागतो. ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya ray bachhan) आणि राणी मुखर्जी(Rani Mukharji)यांच्या सोबतही असच काहीसं घडलेलं आहे. एकेकाळी एक सुंदर बंध सामायिक केलेल्या या दोन अभिनेत्रींमध्ये (राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय या मैत्रिणी का नाहीत?) दोघींमध्ये इतके अंतर कसे आले जे आजपर्यंत पुसले जाऊ शकलेले नाहीत. हे मैत्रीचे धागे तुटण्यामागे नक्की कारण काय असावं असे काही प्रश्न आपल्या मनात पडले असतील. याबद्दल आपण जाणून घेऊयात काही माहिती.

Aishwarya Ray & Rani Mukharji
Nusrat Bharucha Birthday: नुसरत भरुचाचा असा आहे फिल्मी सफर

एक वेळ अशी होती ज्याक्षणी ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी ह्या दोन नामांकित अभिनेत्रींची अगदी घट्ट मैत्री होती. सुखाची संधी असो वा दु:खाचा डोंगर तुटलेला असो दोन्ही सखी प्रत्येक सुख-दु:खात कायम एकमेकांच्या पाठीशी उभ्या असायच्या. प्रत्येक कार्यक्रमात दोघी एकत्र दिसत होत्या. त्याचप्रमाणे दुसरीकडे शाहरुख खान(Shah Rukh Khan) देखील ऐश्वर्या रायचा चांगला मित्र होता. या दोघांचा सुपरहिट चित्रपट 'देवदास' 2002 साली रिलीज झाला होता. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. अशा परिस्थितीत तो त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी शाहरुख खानने आधी काजोलला संबोधले होते. मात्र तिने हा चित्रपट नाकारल्यानंतर राणी मुखर्जीने यात आपली भूमिका पार पाडली. राणीनेही मित्राचा विचार न करता चित्रपटासाठी होकार दिला. अगदी हाच तो काळ होता ज्याक्षणी ऐश्वर्या आणि राणीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. राणी आणि शाहरुख हे दोघेही तिचे चांगले मित्र असल्याने ऐशला फसवणूक झाल्याचा गैरसमज होत होता. पण त्यावेळी दोघांनीही त्याला साथ दिली नसल्याने ऐश्वर्या नाराज झाली होती.

Lokshahi
www.lokshahi.com