अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने केले ब्रेकअप, व्हिडिओमध्ये सांगितले कारण...

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने केले ब्रेकअप, व्हिडिओमध्ये सांगितले कारण...

तेजस्वी प्रकाश हे छोट्या पडद्यावरील एक मोठे नाव आहे, बिग बॉस 15 च्या विजेत्या तेजस्वी प्रकाशचे नाव करण कुंद्रासोबत जोडले गेले आहे.

तेजस्वी प्रकाश हे छोट्या पडद्यावरील एक मोठे नाव आहे, बिग बॉस 15 च्या विजेत्या तेजस्वी प्रकाशचे नाव करण कुंद्रासोबत जोडले गेले आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते आणि अधिकृतपणे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड देखील आहेत. अशा परिस्थितीत करण कुंद्रासोबतच्या लग्नाच्या बातम्यांनीही तेजस्वी चर्चेत असते.

पण आता एक व्हिडीओ शेअर करत तेजस्विनीने ब्रेकअप करत असल्याचं सांगितलं आहे. पण आता अलीकडेच तिचा स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत तिने म्हटले आहे की, माझे नुकतेच ब्रेकअप झाले आहे, त्यानंतर ती पुढे म्हणते की, 'मला अलीकडे खूप पिंपल्सचा त्रास झाला होता. अशा स्थितीत मी मुरुमांसोबत ब्रेकअप करेन, असे ती म्हणते. हा व्हिडिओ तेजस्वीने एका ब्रँडसाठी बनवला आहे. हा स्किन केअर उत्पादनाचा व्हिडिओ आहे. पण तेजस्वी करणशी नाही तर तिच्या पिंपल्सशी ब्रेकअप करण्याबद्दल बोलली आहे हे कळल्यावर तिचे चाहते सुखावले आहेत.

तेजस्वी अजूनही करण कुंद्रासोबत आहे, त्यांनी ब्रेकअप केलेले नाही. दोघेही त्यांच्या कामात कितीही व्यस्त असले तरी एकमेकांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाहीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com