सध्या अनेक हिंदी कलाकारांना मराठी सिनेसृष्टीची भुरळ पडली आहे. मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमठविण्यासाठी हिंदी कलाकार सज्ज आहेत. अशातील एक अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश.
'मन कस्तुरी रे'चा जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटातील 'रंग लागला' हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.