Raj Thackeray | Shiv Thackeray
Raj Thackeray | Shiv Thackeray Team Lokshahi

बिग बॉस फेम शिव ठाकरेने घेतली राज ठाकरेंची भेट

'बिग बॉस १६' फेम मराठमोळ्या शिव ठाकरेने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. शिवची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे

'बिग बॉस १६' फेम मराठमोळ्या शिव ठाकरेने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. शिवची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिव ठाकरेने नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

शिव ठाकरेने राज ठाकरेंसोबत भेटीत काय चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरे यांच्याकडून शाबासकी देण्यात आली. मराठी मुलांना ते नेहमी पाठिंबा देता. सध्या प्रोजेक्ट खूप येत आहेत. शिव ठाकरे कामाची वाट बघत होता. मराठी, हिंदी दोन्हीमध्ये संधी येत आहेत. राज ठाकरे यांनी अभिनंदन केले. गरज नसताना काही लोक पाठीशी असतात. मनसेचे लोक पाठिशी होते, म्हणून पक्ष सोडून एक माणूस म्हणून मी त्यांच्याकडे बघतो, असे त्याने सांगितले आहे.

दरम्यान, शिव ठाकरे लवकरच चित्रपटात झळकणार आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटात शिवही झळकेल, असं बोललं जात आहे. तर, 'खतरों के खिलाडी'मध्येही शिव ठाकरे दिसणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, नंतर याबाबत कोणतीही पुष्टी झाली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com