Salaam Venky
Salaam VenkyTeam Lokshahi

Salaam Venky: काजोलचा ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

बालदिनाच्या निमित्ताने ‘सलाम वेंकी’या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

बालदिनाच्या निमित्ताने ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री काजोलसह विशाल जेठवा, राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा या कलाकारांनी मुख भूमिका साकारली आहे. ‘सलाम वेंकी’या सिनेमाचे दिग्दर्शन अभिनेत्री रेवती यांनी केले आहे. ‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांनीही चांगली पसंती मिळाली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधून आई आणि मुलाच्या नात्यामधले असलेले बाँडिंग दिसत आहे.

‘सलाम वेंकी’ या सिनेमामध्ये सुजाता हे पात्र काजोलनं साकारताना दिसत आहे. तर व्यंकटेश हे पात्र विशाल जेठवानं साकारतो आहे. तसेच या चित्रपटामध्ये आमिर खानही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, सुजाता तिच्या मुलाची म्हणजेच व्यंकटेशची खूप काळजी घेताना दिसत आहे.

Salaam Venky
प्रेक्षकांसाठी गूडन्यूज; लवकरचं RRR 2 येणार भेटीला

‘सलाम वेंकी’ या सिनेमाचा पोस्टर काजोलने तिच्या सोशल मिडिया आकाऊंटवरून शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करून काजोलनं कॅप्शनही दिले होते. काजोलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सलाम वेंकीचा ट्रेलर प्रदर्शित केला असून हा सिनेमा 9 डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर चाहत्यांनी सिनेमाला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com