Ketaki Chitale
Ketaki Chitale Team Lokshahi

केतकी चितळेची मकर संक्रांतीनिमित्त चाहत्यांना कटू शुभेच्छा; म्हणाली, आज पुन्हा लिहिते...

मकरसंक्रांतीनिमित्त केतकी चितळेने एक खास फेसबुक पोस्ट केली आहे.

नेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा चर्चेत आली आहे. कारण आज तिने मकर संक्रांतीनिमित्त चाहत्यांना कटू शुभेच्छा दिल्या आहेत. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावर सोशल मीडियातून आपले मत मांडत असते. याच पार्श्वभूमीवर आता तिने चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ketaki Chitale
अमृता फडणवीसांनी दिल्या खास मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

काय दिल्या केतकीने शुभेच्छा?

मकरसंक्रांतीनिमित्त केतकी चितळेने एक खास फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने चाहत्यांना काटेरी शुभेच्छा दिल्या आहेत. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असं म्हणत आज देशभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. परंतु, ती पोस्ट मध्ये म्हणाले की, जे वर्षानुवर्षे मी लिहीत आले आहे तेच आज पुन्हा लिहिते आहे, तीळगूळ खा व खोटे गोड गोड न बोलता कडू सत्य बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com