Kuttey Movie
Kuttey MovieTeam Lokshahi

'कुत्ते' सिनेमा प्रदर्शित; जाणून घ्या कलेक्शन...

चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांचा मुलगा आसमान भारद्वाजचा 'कुत्ते' (Kuttey) हा सिनेमा 13 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांचा मुलगा आसमान भारद्वाजचा 'कुत्ते' (Kuttey) हा सिनेमा 13 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकुळ घातला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरलाही सिनेप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता सिनेमालाही तेवढाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

कुत्ते या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटींचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे आता वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर कुत्ते या सिनेमाची निर्मिती 35 कोटींमध्ये करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Kuttey Movie
अर्जुन कपूरच्या 'कुत्ते'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

'कुत्ते' (Kuttey) हा सिनेमामध्ये अभिनेता अर्जुन कपूर मुख भूमिका साकारत आहे. अर्जुनसोबत या सिनेमामध्ये कुमुद मिश्रा, नसीरुद्दीन शाह, तब्बू, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज हे कलाकार मुख भूमिका साकारत आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज देणार असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com